जे बोललो ते करून दाखवले- आमदार विक्रम काळे
मुंबई (दि.१८ मार्च) : काल दि.१७ मार्च २०२१ रोजी राज्यातील 33,300 शिक्षक कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन मिळण्यासाठी रुपये 140 कोटीचा निधी वितरित करण्यात आला. दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी पात्र झालेल्या शाळा, कनिष्ठ महा.व वर्ग तुकड्यांना सीएफ फंडातून आर्थिक तरतूद द्यावी यासाठी आ.विक्रम काळे सर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रयत्नांती अर्थमंत्री ना.अजित दादांनी दि.01 मार्च 2021 रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर करतो असे भेटीअंती स्पष्ट केले होते. त्यानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पुरवणी मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाली. त्यानंतर दिनांक 09 मार्च 2021 रोजी सभागृहात प्रश्न उपस्थित करून या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली होती. निधी वितरणाचा शासन निर्णय दि. 31 मार्च 2021 पूर्वी काढला जाईल असे शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिले होते. त्यानुसार कालपासून आ.विक्रम काळे सर यांनी शासन निर्णय काढण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडले. शालेय शिक्षण व वित्त विभाग यांचे सर्व सोपस्कार पूर्ण करून आज दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या प्राथ,माध्य व उच्च माध्यमिक शाळा व वर्गतुकड्यांना नव्याने 20 टक्के वेतन अनुदान व 20 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना 20 टक्के वाढीव वेतन अनुदान दि. 01 नोव्हेंबर 2020 पासून देण्यासाठी रुपये 140 कोटीचा निधी वितरणाचा शासनादेश शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. त्याचा लाभ राज्यातील प्राथमिक 5,819 माध्यमिक 18,575 व उच्च माध्यमिकच्या 8820 शिक्षक कर्मचाऱ्यांना होणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आ.विक्रम काळे यांनी ना.अजित दादा पवार साहेब, ना.वर्षाताई गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

0 टिप्पण्या