Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

दि. 08 फेब्रुवारी सोमवारपासून राज्यातील विनाअनुदानित शाळा राहणार बंद

दि. 08 फेब्रुवारी सोमवारपासून राज्यातील विनाअनुदानित शाळा राहणार बंद

शिक्षक आंदोलन (आझाद मैदान, मुंबई)

मुंबई (दि.०६ फेब्रु) - दि. 29 जानेवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे शिक्षकांचा बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात विलंब होत असल्याने राज्यातील अनेक शि क्षकांनी मुंबई येथे धरणे आंदोलन केले आहे. शिक्षक समन्वय संघाची आंदोलनाची दिशा बदलली. राज्यातील अनेक शिक्षकांनी संतप्त होऊन स्वयं स्फूर्तीने सोमवारपासून शाळा बेमुदत बंद करणार आहेत.  अश्या पद्धतीने शिक्षक समन्वय संघाकडून जाहीर करण्यात आले आहे. व जास्तीत जास्त संख्येने विनाअनुदानित शिक्षकांनी शाळा बंद करून आझाद मैदान, मुंबई ययेथे आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासकीय दिरंगाईच्या त्रासाला कंटाळून 1146 आंदोलक शिक्षक व शिकेत्तर येत्या 10 तारखेपर्यंत  मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलक शिक्षकांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.

■सद्या २०%अंशतः अनुदानित असलेल्या शाळांना व 

तुकड्यांना पुढील ४०% निधी वितरण आदेश काढणे..

■१३ सप्टेंबर २०१९ पर्यंत सर्व घोषित प्राथमिक ,माध्य, उच्चमाध्य शाळा  शाळा तुकड्यांना २०% निधी वितरणाचा आदेश काढणे.

■अघोषित शाळा,नै. वा. तूकड्या निधीसह घोषित करणे.

■कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देणे.. 

■मागील १९ महिन्याचा पगार भरून मिळणे.

■१५ नोव्हेंबर २०११ व  जून २०१४ शासन निर्णयानुसार अनुदान सूत्र लागू करणे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या