आवश्यकता भासल्यास 1 मार्च पासून पुन्हा शाळा बंद कराव्यात- शिक्षणमंत्री यांचे महत्त्वाचे निर्देश
मुंबई - (दि.२५ फेब्रु) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे त्या अनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत सांगितले आहे. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1364892817365946368?s=19
कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा :
राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी, मा. समाजकल्याण मंत्री व मा. आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे. अश्या प्रकारचे माहिती शिक्षणमंत्री यांनी फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे.

0 टिप्पण्या