Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

शासन अजून कुंभकर्णाच्या भूमिकेतच का? - समन्वय शिक्षक

शासन अजून कुंभकर्णाच्या भूमिकेतच का? - समन्वय शिक्षक




मुंबई-(दि.२५फेब्रु) : राज्यातील शिक्षकांचा आझाद मैदान येथे चालू असलेल्या आंदोलनाचा २८ वा दिवस. संपूर्ण आझाद मैदान शिक्षकांच्या आक्रोशाने गजबजलेले आहे. तरीही शासन कुंभाकर्णाच्या भूमिकेत आहे. असे चित्र आपल्याला आझाद मैदान येथे बघायला मिळते. या आंदोलनास अनेक मान्यवरांनी पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत भेटी दिल्या दोन दिवस, पंधरा दिवस करत-करत आज अठ्ठावीस दिवस झाले तरीही शासनास अजूनही जाग आली नाही. अश्या या कोरोना काळात राज्यातील अनेक भागातून आलेले शिक्षक आंदोलनात आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. यात काही शिक्षकांची मुले आपल्या आई- वडिलांचा पगार सुरू व्हावा या आशेने त्यांच्या सोबत उन्हातान्हात आंदोलनात साथ देत आहे. तरीही सरकार झोपलेले का? 

       अनेक वेळा नेतेमंडळी आश्वासन देऊन जातात आणि दुसऱ्या क्षणी त्याचा विसर पडतो. शासन कधीतरी आपला हक्क देईल अश्या आशेने शासनास नेहमी आठवण करून दिली जाते पण हे शासन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र दिसून येते. आता शिक्षकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यामुळे समन्वय शिक्षक यांनी फेसबुक लाईव्ह येऊन आमदार विक्रम काळे यांचा सत्कार कसा करायचा हे मी ठरवलंय असे म्हणत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. तसेच आज आझाद मैदान येथे अनुदानाचा जीआर निघाला नाही तर रक्ताचा अभिषेक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.


जवाब दो!!जवाब दो!!जवाब दो!! समन्वय शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्याकडे सरकार का दखल घेत नाही? 


◆शिक्षकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आंदोलनाला भेट देतेवेळी १५ दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते. तरी अजूनही शिक्षणमंत्री यांचे पंधरा दिवस झाले नाही? 

◆ मंजूर पुरवणी मागणी रद्द केली जाते असे कोणत्या  राज्यशास्त्रात बसते?

◆ज्या पक्षाचा एकही नेता , आमदार आंदोलनाला भेट देत नाही. म्हणजे त्यांचाच १००% अनुदानाला विरोध आहे. असे समजावे का?

◆ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू आणि शिक्षक समन्वय संघाचे के.पी. पाटील यांच्या लाईव्ह डिबेटमध्ये बच्चू कडू यांनी सांगितले की, तपासणी झाल्यावर ताबडतोब  चार दिवसाच्या आत अनुदान वितरणाचा आदेश निघेल आणि असे जर झाले नाही तर मी स्वतः शिक्षकांसोबत उपोषणाला बसेल. आता कुठे गेले साहेब? 

◆ विनाअनुदानित शिक्षकांच्या पोटाची आग मिटणार का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या