जिल्ह्यातील सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद - पालकमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर -(दि. २४ फेब्रु) : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


0 टिप्पण्या