छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आझाद मैदान येथे साजरी करण्यात आली.
आपल्या माहितीसाठी सादर...
चला आझाद मैदान !!! चला आझाद मैदान !!!
आता नाही तर कधीच नाही...
महाराष्ट्र्रात अनेक संघटनांनी आंदोलनं केली पण हे आंदोलन इतिहास घडवणार आहे आणि या इतिहासात सामील होण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे एक समन्वयक शिक्षक के.पी. पाटील यांचे घरी असणाऱ्या शिक्षकांना आव्हान करणारा महत्वपूर्ण संदेश :
सदरील आंदोलन शिक्षकांनी, शिक्षकासाठी पुकारलेले आहे. त्यामध्ये कुणीही प्रमुख नाही आहे. इथे प्रत्येक शिक्षक नेतृत्व करतो आहे. हेतूपुरस्सर एखाद्या व्यक्तीच नाव घेऊन आम्हा शिक्षकांच्या एक विचार, एक आंदोलन या मध्ये भेद करू नये. आपण सर्वच शिक्षक आणि समन्वयक आहोत. हे आपल्या सर्वांच्या हक्काचे विचारपिठ तयार झाले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष व विरोधीपक्ष सोबत सर्वसामान्य शिक्षकांची ताकद ओळखून मैदानावर भेट देऊन जात आहेत. शासननिर्णय घेतल्याशिवाय माघार नाही या आपल्या ठाम असण्याला सलाम करत आहेत. या शिक्षक एकत्र आला तर काय होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.
एप्रिलमध्ये जाहिर होणाऱ्या पात्र, अपात्र याद्या शिक्षकांनी स्वतःच्या ताकदीवर फेब्रुवारीच्या पहिल्याच लावून घेतल्या आहेत. त्याला लागणारा निधी देखील तिसऱ्या आठवड्यातच मंजूर होतांना दिसतो आहे. यासोबतच अघोषितची विषय पूर्णपणे थांबलेला परंतू अघोषित बांधवाच्या प्रचंड उपस्थितीने त्यावर दोन वेळा बैठका पार पडत आहेत. त्यास देखील अंतिम स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती मा.निलमताई गो-हे, शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड, राज्य शिक्षणमंत्री बच्चूभाऊ कडू, राज्याचे मा.विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, राज्याचे विरोधीपक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस, मा.प्रविणजी दरेकर यांच्यासह माजी खासदार शिक्षक व पदविधर, विधानसभा सदस्य, काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी येत आहेत, प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सर्व केवळ आपल्या सर्वसामान्य शिक्षकांच्या एकीमुळे घडते आहे.
हे सर्व मान्यवर प्रश्न मुळासकट मिटवण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्यातले काही बांधव मात्र घरी बसून गेली २३ दिवस उन्हात-तान्हात बसलेल्या बांधवाच्या खांद्याला-खांदा लावून लढण्याऐवजी निपचित मजा पाहत आहे. ६३१२७ बांधवापैकी फक्त मोजकेच बांधव मैदानावर बसले आहेत. आपली जास्तीची उपस्थिती आपल्याला खुप काही जास्त मिळवून देणार आहे. त्यामचळे येणे अगत्याचे आहे.
धन्यवाद!
कळावे,
मोठ्या संख्येने
मैदानाकडे वळावे.!!
आपले नम्र,
के.पी.पाटील
समन्वयक तथा
समस्त समन्वयक
शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य.

0 टिप्पण्या