आर.बी.एच कन्या विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले...
मालेगांव- (दि.२८ फेब्रु) : मालेगांव तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित आर बी एच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव कॅम्प येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील उपप्राचार्या सौ ठाकरे सुचरिता मॅडम होत्या. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी विज्ञानाचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले. तसेच विज्ञान दिनाच औचित्य साधून शाळेतील अटल लॅब मध्ये विद्यार्थिनींनी तयार करण्यात आलेल्या उपकरणांचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच 11 वी विज्ञान शाखेने क्विज कोंपिटीशन ठेवण्यात आली. उपशिक्षिका श्रीम शेवाळे एम बी व श्रीम व्ही बी पाटील मॅडम यांनी विज्ञान विषयी माहिती दिली. प्राचार्या सौ प्रमिला पाटील मॅडम यांनी विज्ञानानाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले. अध्यक्षीय भाषणात ठाकरे मॅडम यांनी विज्ञानमुळे माणसाने आपली प्रगती कशी केली याबाबत माहिती दिली. विज्ञान प्रमुख श्रीम शेवाळे एम बी व श्रीम पाटील व्ही बी, श्रीम पाटील जे एम, श्री बागूल के एस व सर्व विज्ञान शाखेतील प्राध्यापक आणि विद्यालायतील विज्ञान शिक्षक बंधुभगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या सौ प्रमिला पाटील, उपप्राचार्या सौ ठाकरे सुचरिता, उपप्राचार्य श्री सावंत एस पी, पर्येंवेक्षिका सौ शेख एन एस व श्रीम बोरसे मॅडम आणि सर्व शिक्षक बंधुभगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शेवाळे एम बी आभार श्रीमती पाटील व्ही बी यांनी केले..



0 टिप्पण्या