Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

आजपासून राज्य विधिमंडळचे अधिवेशन सुरू होत आहे तरी महाराष्ट्रातील आंदोलक शिक्षकांची आझाद मैदानावर उपस्थिती बंधनकारक

आजपासून राज्य विधिमंडळचे अधिवेशन सुरू होत आहे तरी महाराष्ट्रातील आंदोलक शिक्षकांची आझाद मैदानावर उपस्थिती बंधनकारक




मुंबई- (दि.01 मार्च) : आझाद मैदान येथे गेल्या 30 दिवस्पून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात आपल्यापैकी अनेक जण आतापर्यंत योगदान सातत्याने लाभत आहे. त्यामुळे आता आजपासून राज्य विधिमंडळचे अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन दरम्यान सभागृहात विरोधकांकडून आपल्या प्रश्नावर जोरदार आवाज उठवला जेल त्यावेळी आपली मैदानावर आपली उपस्थिती अत्यावश्यक आहे. तरी आझाद मैदानावर मागील दिवसापासून करतार सर, सुरासे सर, कोरे सर, खट्टे मॅडम व अनेक शिक्षक बंधू युद्धभूमी सांभाळत आहे. 

        काल दि. 28 फेब्रु 2021 रोजी के.पी. पाटील यांनी फेसबुक द्वारे ऑनलाईन येत अनेक प्रश्नांचे निराकरण केले तसेच मार्गदर्शन केले आहे. मागील कित्येक वर्षापासून 124 अघोषित शिक्षक बांधव आपले शैक्षणिक कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहे. आणि त्यांचे आता शैक्षणिक वर्ष येत्या संपत आले आहे. ते आता 01 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तरी याचा शासनाने सकारात्मकता दाखवावी. तसेच महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक आमदार यांनी एक मूठ मारून जर आपला प्रश्न निकाली काढला तर आपला निर्णय नक्कीच कायमचा मार्गी लागू शकतो. तसेच आतापर्यंत मिळालेले यश हे फक्त आपल्या उपस्थितीमुळे झाले आहे आणि यापुढे उरलेले यश आपल्याला कवेत घेताना दिसून येत आहे. अनेक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवा. आता कोरोनाचा प्रभाव जरी असला तरी आपल्याला शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून आंदोलन चालू ठेवायचे आहे. तसेच कोणत्याही फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता आपला हक्क मिळवण्यासाठी आपण आझाद मैदान गाठा. असे सूचना के. पी. पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना पुन्हा नव्याने आव्हान केले आहे. व आजपासून आझाद मैदानावर येणाऱ्या शिक्षकांनी 24 तास उपस्थिती दाखवून मुक्कामी राहण्याची मानसिकता ठेवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या