Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांचे काय? अजूनही प्रश्न चिन्ह कायम

अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांचे काय? अजूनही प्रश्न चिन्ह कायम


मुंबई - (दि.01 मार्च) : आज विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आणि पहिल्याच अधिवेशनात शालेय शिक्षण व क्रिडा भागाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानास पात्र शाळांची पुरवणी यादी समाविष्ट करून मंजूर करण्यात आली आहे. 1000 व 3000 टोकण रक्कम मंजूर केली गेली आहे. तसेच तरी सर्व शिक्षकांचे लक्ष आता निधी वितरणाचा GR वर आहे. त्यामुळे आंदोलन कर्ते सर्व समन्वय शिक्षक जो पर्यंत शासन निर्णय हातात येत नाही तोपर्यंत आझाद मैदान आम्ही सोडणार नाही. यावर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ठाम आहेत. व प्रचलित नियमानुसार अनुदानाचा निर्णय करावा व अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्या यावर कोणते निर्णय घेण्यात आले नाही म्हणून सर्व शिक्षकांचे याकडे विशेष लक्ष आहे. अजूनही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. तरी आपले यश हे आपल्या हातात आहे म्हणून सर्व शिक्षक बांधवाना पुन्हा आणि वारंवार समन्वय शिक्षक संघ हे सूचना आणि आव्हान करीत आहे. आपला हक्काचा पगार मिळवण्यासाठी आझाद मैदान गाठा आणि कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, आझाद मैदान गाठा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या