पुन्हा एकदा कोरोनाच्या काळात शाळेबाबत पालकमंत्री यांचा महत्वाचा निर्णय
नाशिक - (दि.२२ फेब्रु) : शाळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पुढील आठ दिवस शाळा या सुरूच राहणार आहेत. परंतु जर या दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला तर मग मात्र शाळांवर देखील बंदी येण्याची शक्यता येऊ शकते ही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वर्तवली आहे. कारण काल दि. २१ फेब्रु २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तसेच काल एका खाजगी शाळेत आढळलेल्या कोरोना बाधित विद्यार्थी यावरून झालेल्या बैठकीत चांगलीच चर्चा झालेली दिसून येते. यावरूनच शाळांवर बंदी घालावी की नाही यावरून अधिकारी व पदाधिकारी यांच्यात वाद झाल्याचे समजते. अश्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत पुढील आठ दिवस शाळांवर लक्ष ठेऊन जर शाळेतील विद्यार्थी हे जर बाधित आढळत असतील तर मग शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता देखील घेण्यात येईल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वर्तवली आहे यामुळे एकूणच निदान आठ दिवस शाळांना किंवा विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा जरी मिळाला असला तरी देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.

0 टिप्पण्या