अनेक शिक्षक आपल्या बायको मुलांना घेऊन आझाद मैदानावर आहेत. तर मग तुम्ही घरी का?
मुंबई - (दि.22 फेब्रु) : मुंबई आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाला 25 दिवस झाले. आंदोलनाला अनेक नेते मंडळी, सत्ताधारी व विरोधी पक्ष नेते येऊन गेले अनेक असे आश्वासने दिली. पण तरीही आश्वासनांना भूल न पडता. समन्वय शिक्षक संघ व शिक्षक यांनी विश्वास न ठेवता आंदोलन चालूच ठेवले आहे.
कालच पुन्हा एकदा कोरोनाचे सावट सुरू झाल्याने मा. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे पर्शवभूमीवर काही महत्वाचे सूचना केल्या आहेत. यामुळे आझाद मैदानावर येण्यासाठी अनेक शिक्षकांनी आपापले तिकीटे रद्द केली त्यामुळे समन्वय शिक्षक के.पी.पाटील यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन मुंबईला येणाऱ्या शिक्षकांना सूचना केल्या समाज दिली. आणि मुंबईला येण्याचे आव्हाहन केले. तसेच आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून अनेक शिक्षक उपस्थित आहे आणि अनेक शिक्षक हे आंदोलनाला ये जा करतात. तसेच सुरासे सर यांनीही फेसबुकवर लाईव्ह येऊन ज्या कोणा शिक्षकांना मुंबईला येण्यासाठी किंवा राहण्यासाठी अडचण निर्माण होत असेल विजय सुरासे सर स्वतः त्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे घरी बसलेल्या शिक्षकांना अनेक समन्वय शिक्षकांनी मुंबईला येण्याचे आव्हान केले आहेत तरी काही शिक्षक फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका करत आहे.
अनेक शिक्षक आपल्या बायको मुलांना घेऊन आझाद मैदानावर आहेत. तर मग तुम्ही घरी का? असे अनेक समन्वय शिक्षकांच्या मनात उद्भवत आहे. जर आपल्याला आपल्या हक्काचा पगार हवा असेल तर आत्ताच मुंबई गाठा आणि या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी व्हा.तर शिक्षक मित्रांनो चलो आझाद मैदान !!!चलो आझाद मैदान !!!चलो आझाद मैदान !!!चलो आझाद मैदान !!!




0 टिप्पण्या