शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा अनुदानासाठी मंत्रालयात ठिय्या
मुंबई -(दि.22 फेब्रु) : आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या शाळा अनुदानाच्या अनुषंगाने शाळांना 20% व 40% वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा. यासाठी फाईलचा पाठपुरावा सुरू आहे. आज सकाळी काही आंदोलनकर्ते समवेत वर्षाताई गायकवाड यांची डॉ. सुधीर तांबे यांच्यासह भेट घेतली. त्यावेळी निधी वितरणाचा जीआर उद्याच काढावा तसेच प्रचलित धोरण पुन्हा लागू करण्याबाबत निर्णय करावा. तसेच मंत्रालय स्तरावर असलेल्या सर्व शाळा व वर्ग तुकड्यांना या बरोबरच वेतन अनुदान वितरण करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा अशी आग्रही भूमिका मांडली. त्यानुसार अर्थ सचिव, नियोजन सचिव, अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात जाऊन फाईलचा पाठपुरावा केला. फाईल स्वाक्षरी होऊन शिक्षण विभागात आली आहे. तसेच आज काझी साहेब रजेवर असल्याने त्यावर कारवाही झाली नाही. उद्या परत त्याचा पाठ पुरावा करणार तसेच त्रुटी सादर करण्यासाठी मुंबई येथेच वेळापत्रक ठरवून विभाग निहाय त्रुटी सादर करून घेऊन त्याच जागी तपासून हो- नाही चे शाळा पात्र - अपात्रचा निकाल देण्याविषयी शिक्षणमंत्री यांनी संबंधितांना आदेशीत केले आहे. असे आमदार विक्रम काळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून सांगितले आहे.


0 टिप्पण्या