Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

शाळा अनुदान अपडेट-निधी वितरणाचा शासन आदेश लवकरच निघणार-आमदार विक्रम काळे

शाळा अनुदान अपडेट-निधी वितरणाचा शासन आदेश लवकरच निघणार-आमदार विक्रम काळे 

मुंबई - (दि.१६ मार्च) : आज सकाळी आ.विक्रम काळे सर निधी वितरणाचा जीआर काढण्यासाठी सकाळी 11.00 वाजल्यापासून ते सायं. 7.10 मिनिटं पर्यंत मंत्रालयात ठिय्या मांडून होते. आज त्यांनी आपल्या शिक्षकांसाठी दिवसभराचा उपवास केला. शर्तीचे प्रयत्न करून शिक्षण विभागातून फाईल तयार करून ती वित्त विभागात नेली. श्री.पेठकर, श्री.व.क्र.पाटील, श्री.मित्तल साहेब, श्री.शौनीक साहेब या सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पुरवणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करून फाईल पुन्हा शिक्षण विभागात आणली. वेगवेगळ्या हेड खाली मंजूर असलेला निधी एकत्र करून रुपये 140 कोटीच्या निधी वितरणास शासन आदेश काढण्याची परवानगी देण्यासाठी पुन्हा फाईल सायं.7.00 वाजता वित्त विभागाकडे नेली ती उद्या मंजूर होईल आणि दिनांक 01 नोव्हेंबर 2020 पासून 40% टप्पा वाढ व नव्याने 20 % वेतन अनुदान होण्यासाठी निधी वितरणाचा आदेश निघेल. या दिवसभराचा कामकाजामध्ये आ.डॉ.सुधीर तांबे दिवसभर उपस्थित होते. शिक्षण विभागाचे श्री.काझी साहेब, श्री.सावंत, श्री.आव्हाड, श्री.राजेंद्र पवार साहेब, श्री.धुमाळ व शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबरोबरच कोल्हापूर व मुंबई विभागाच्या कनिष्ठ महाविद्यालयांना सुद्धा निधी मिळावा यासाठी सुद्धा शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती विक्रम काळे यांनी आपल्या फेसबुक पेजद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या