Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार -अरुण लाड

 विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार -अरुण लाड


मुंबई (दि. १९ फेब्रु) : मुंबई आझाद मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून १० ते १५ हजार शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक मान्यवर व विरोधीपक्ष नेते यांनी भेटी दिल्या आणि आश्वासने दिली. तरीही शिक्षाकांच्या मागण्या मान्य होत नाही त्यातच दि. १७ फेब्रु रोजी मा. वर्षाताई गायकवाड यांच्या बंगल्यावर आंदोलक शिक्षक गेल्यावर त्यातील पाचशे शिक्षकांना अटक करण्यात आले. व दि. १८ फेब्रु रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात भेट दिली व नेहमीप्रमाणे आश्वासनं पदरात पडली. त्यातच काल दि. १८ फेब्रु रोजी अरुण लाड यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली ती खालील प्रमाणे- 

"गेली कित्येक दिवस आझाद मैदानावर आपले शिक्षक बांधव हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. मुंबई मध्ये असताना आंदोलनस्थळी त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेतल्या होत्या. यामध्ये शिक्षकांचा 20% आणि 40% अनुदानाचा जो प्रश्न होता तो अत्यंत महत्त्वाचा होता. याच संदर्भातील सर्व माहिती घेऊन मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि अखेर त्याला यश आले. 

          मा. उपमुख्यमंत्र्यांची आज सदर पत्रावरती सही होऊन आता हे प्रकरण मा. मुख्यमंत्र्यांच्या सहिसाठी त्यांच्या दालनात पाठवले आहे. लवकरचं मा. मुख्यमंत्र्यांची सही होऊन शिक्षक बांधवांचा हा प्रश्न मार्गी लागेल."

अश्या आशयाचे पोस्ट बघायला मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या