Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

चर्चा करून राज्यपालांना दिले हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे निवेदन...

राज्यपालांनी दिले सकारात्मक प्रतिसाद!




औरंगाबाद- (दि१७ फेब्रु) :  हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन च्या शिष्टमंडळाने मुंबईला जाऊन राज भवनात घेतली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगत सिंह कोशयारी जी ची भेट. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे प्रथम  संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केले परंपरा नुसार पुस्तक व मोमेंटो देऊन राज्यपाल मोहदयांचे केले सत्कार व त्यानंतर सविस्तर चर्चा करून एक निवेदन सादर करण्यात आले.  सर्व प्रथम आजाद मैदानावर बसलेले विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली व विनाअनुदानित बांधवांची व्यथा मांडण्यात आली व त्यांना लवकरात लवकर प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे ही विनंती करण्यात आली त्यानंतर मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नौकरीत कमीत कमी 10 आरक्षण मिळावे तसेच यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे KG टू PG पर्यंत सर्व पुस्तके मोफत मिळावी तसेच अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मध्ये येणाऱ्या तमाम अडचणी त्वरित सोडण्याची विनंती करण्यात आली. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ला आज राजभवनात राज्यपालांची भेट घेण्याकरिता आमंत्रित करण्यात आले होते.शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, अमोल कुलकर्णी सर, सय्यद अब्दुल रहीम सर, सय्यद ताजीमोद्दीन तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या राज्य महिला प्रतिनिधी सुनेहरा शेख आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या