Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण रद्द करा- छात्रभारती संगमनेरचा प्रांत कार्यालयवर ठिय्या मोर्चा

विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण रद्द करा- छात्रभारती संगमनेरचा प्रांत कार्यालयवर ठिय्या मोर्चा

संगमनेर (दि.१७ फेब्रु) - महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक गेल्या २९ जानेवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करीत आहे. गेली कित्येक वर्षे विनाअनुदानित धोरण रद्द करावे अशी मागणी शिक्षक व विद्यार्थी करत आहेत. परंतु शासन खोटे आश्वासन देऊन नेहमी शिक्षक व विद्यार्थी यांची नेहमी थट्टा करत आहे. कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या. परंतु या गेंड्याच्या कातडीचा सरकार अनुदान द्यायला तयार नाही. शासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. मुंबई येथे शिक्षकांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. 


हजारो शिक्षक थंडी- उन्हांत बसलेले आहे. परंतु सरकार त्यांना आश्वासनावर आश्वासन देऊन त्यांची थट्टा करीत आहे. मागील भाजपच्या सरकारने पाच वर्षे अनुदान देण्याची फक्त आश्वासनाची गाजरच दाखवली आपणही त्यांचाच अजिंडा पुढे चालवताना दिसत आहे. सत्तेत येण्याच्या अगोदर १००% अनुदान देऊ म्हणणारे, सत्तेत आल्यावर तोंड उघडायला तयार नाही. विनाअनुदानित तत्वावर सुरू असणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्था सरकारमधील लोकांच्या आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या पगाराच्या नावाखाली व काहीही बोगस खर्च दाखवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये लुटतात, हे सरळ-सरळ शिक्षण देण्याची नावाखाली सरकार व शिक्षण संस्था लूट करत आहे. शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते मोफतच दिले पाहिजे. शिक्षणाने देश घडतो, पण तुम्ही तर शिक्षक आत्महत्या करत असताना ही लक्ष द्यायला तयार नाही. तरी शासनाने शुद्ध बुद्धीने विचार करून विद्यार्थी व शिक्षक यांना १००% अनुदान द्यावे अन्यथा छात्रभारतीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करणार असा इशारा शासनाला देण्यात आला आहे. असे निवेदन काल दि. १६ फेब्रु २०२१ रोजी प्रांत अधिकारी, संगमनेर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आले. 20 वर्ष झाली महाराष्ट्र मधील सरकार यांनी शिक्षक यांना फक्त गाजर दाखवली, छात्रभारती च्या विद्यार्थ्यांनी सरकारला गाजर पाठवून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनात छात्रभारती राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्यध्यक्ष तुषार पानसरे, तालुका अध्यक्ष राहुल जऱ्हाड, संघटक ऋषीकेश वाकचौरे, उपाध्यक्ष सोमा फापाळे, कार्यवाह हर्षल कोकणे, सचिव तृप्ती जोर्वेकर, सदस्य शुभम गोर्डे, साहिल जोर्वेकर, सागर गुंजाळ, सानिया शिंदे, साहिल जोर्वेकर, काकड प्रशांत काकड प्रशांत, डोंगरे सर, छात्रभारतीचे माजी कार्यकर्ते गोपीनाथ घुले सर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या