Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

शाळा अनुदान अपडेट- तर उद्या सुध्दा शासन निर्णय निघेल असे ना.अजित दादांनी स्पष्ट केले.- विक्रम काळे

शाळा अनुदान अपडेट- तर उद्या सुध्दा शासन निर्णय निघेल असे ना.अजित दादांनी स्पष्ट केले.- विक्रम काळे




मुंबई-(दि. २४फेब्रु) : काल सकाळी 7.00 वाजता ना.अजित दादा यांच्या घरी भेट व चर्चा त्यानंतर मा. शिक्षण मंत्र्यांच्या घरी तेथे आ.डॉ.सुधीर तांबे,आ.बाळाराम पाटील हेही आले. त्यांच्यासह चर्चा त्यानंतर मंत्रालय. काल परत आलेली फाईल पुन्हा घेऊन मा.मंत्री महोदयांनकडे दिली व ना.अजित दादा पवार साहेब यांच्या कडे भेटायचे ठरले. त्यानुसार परत सायं.7.00 वा. शिक्षण मंत्री महोदयांसह ना.अजित दादा पवार साहेबांच्या घरी फाईल घेऊन चर्चा झाली. तेव्हा शिक्षण विभागाकडे असलेला निधी तो पुरेसा नाही अपुरा आहे. त्यामुळे पुरवणी मागण्यातच तरतूद करावी लागेल. पण तरीसुद्धा आज सकाळी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या बरोबर चर्चा करून मा.राज्यपालांना बोलायला लावून CF मधून परवानगी दिली तर उद्या सुध्दा शासन निर्णय निघेल असे ना.अजित दादांनी स्पष्ट केले. व आता स्वतः रात्री 9.15 वा. बैठक संपवून आम्ही सर्व जण परतलो. परत सकाळी या फाईलचा पाठपुरावा करून शासन निर्णय काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहणार. त्याच बरोबर मुंबई स्तरावरील अघोषित शाळा व वर्ग तुकड्या वेतन तरतुदीसह घोषित करणे व प्रचलित धोरण मंत्रिमंडळा समोर आणण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या