Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील १०वी व १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्ग बंद

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील १०वी व १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्ग बंद

नाशिक- (दि.०२मार्च) : राज्यातील कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होवून साथरोग नियंत्रणाखाली आल्याने शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये या धारणेतून शाळा सुरु करणे विद्यार्थ्यांसाठी हितावह राहील यानुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग दिनांक 04 जानेवारी 2021 पासून व इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग दि. 27 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यास संदर्भ क्र. 6 व 7 च्या परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सद्य: स्थितीत राज्यात कोविड बाधित रुग्णाची संख्येत वाढ होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व कोविड-19 उपाय योजना नियम, 2020 नुसार कोरोना विषाणू (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 5 वी ते 9 वी व 11 वीचे वर्ग दिनांक 15 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि इयत्ता 10 वी व 12 वीचे वर्ग इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी सुरु राहतील, परंतु यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक राहील. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न बोलवता वर्क फॉर्म होम, ऑनलाईन शिक्षण या पध्दतीने विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कामकाज करावे. तसेच शिक्षकांकरिता शालेय कामकाज व शाळा बाहय विद्यार्थी सर्वेक्षण मोहिम सुरु राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या